Young man from Maharashtra went to Canada for education but faced an unexpected ordeal cm Devendra Fadnavis help; मराठी मुलगा शिक्षणासाठी कॅनडात गेला, पण नंतर वेगळाच अनुभव; परतीसाठी धडपड, फडणवीस मदतीला धावले
Young man from Maharashtra went to Canada for education but faced an unexpected ordeal cm Devendra Fadnavis help; मराठी मुलगा शिक्षणासाठी कॅनडात गेला, पण नंतर वेगळाच अनुभव; परतीसाठी धडपड, फडणवीस मदतीला धावले
नागपूर : कॅनडातील व्हॅन्कुव्हर येथे अडकलेल्या जसदीप सिंग ओबेरॉय यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अखेर भारतात पुनरागमन झाले. मुलाच्या परतीची आस लागलेल्या आई-वडिलांनी नागपूर विमानतळावर त्याचे स्वागत केले. मुलगा सुखरूप परतल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. जसदीप सिंग ओबेरॉय हे २०१९ मध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी कॅनडाला गेले होते. शिक्षणानंतर त्याला अपेक्षित नोकरी मिळाली नाही. त्यातच व्हिसाची मुदत संपल्याने त्याचा रोजगारही गेला आणि तो आर्थिक अडचणीत सापडला.
दरम्यान, कॅनडातील प्रतिकूल परिस्थितीचा जसदीप यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला. वातावरण सहन न झाल्याने त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परदेशात अडकलेल्या मुलाला मदत मिळवून देण्यासाठी कुटुंबीयांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. जसदीप यांच्या वडिलांनी अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने हालचाली करत परराष्ट्र मंत्रालय आणि कॅनडातील भारतीय वाणिज्य दूतावासाशी समन्वय साधला. जसदीप याचा उपचारांसह त्याला भारतात परत आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात आली.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॅनडा सरकारकडेही विनंती करत जसदीप यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले. अखेर या प्रयत्नांना यश आले आणि जसदीप भारतात परतले. नागपूर विमानतळावर मुलाला पाहताच आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तब्बल काही वर्षांनंतर आपला एकुलता एक मुलगा पुन्हा डोळ्यांसमोर पाहायला मिळाल्याने त्यांच्या भावनांना बांध फुटला.
जसदीप यांच्या आईने सांगितले की, “माझा मुलगा २०१९ मध्ये एमबीए करण्यासाठी कॅनडाला गेला होता. त्यानंतर त्याला नोकरी मिळाली नाही. तिथे नोकरीच्या प्रतीक्षेत असतानाच त्याची तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आम्हाला भारतातून त्याला मदत करणे खूप त्रासदायक होते. त्यानंतर आम्ही आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे गेलो. त्यांनी आमची मदत केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून उपचारासाठीही मदत मिळाली. कॅनडा सरकारकडून आमच्या मुलाला कोणतीही मदत मिळत नव्हती. मागील तीन वर्षांपासून तो नोकरीशिवाय तिथे राहत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय वाणिज्य दूतावासाशी समन्वय साधून आमच्या मुलाला परत आणले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार कसे मानावेत, हेच मला कळत नाही. आज आमचा एकुलता एक मुलगा आम्हाला परत मिळाला, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे,” असे जसदीप यांच्या आईने भावुक होत सांगितले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा