Warning of heavy rains for 48 hours in vidarbha concerns rise over rainfall deficit; पावसाच्या तुटीने चिंता वाढलेली असतानाच आनंदाची बातमी; 48 तास अतिवृष्टीचा इशारा
Warning of heavy rains for 48 hours in vidarbha concerns rise over rainfall deficit; पावसाच्या तुटीने चिंता वाढलेली असतानाच आनंदाची बातमी; 48 तास अतिवृष्टीचा इशारा
Vidarbha Rain Updates: विशेष म्हणजे विदर्भातील केवळ गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गोंदियात आतापर्यंत ५८० मिमी पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीपेक्षा सुमारे एक टक्का अधिक आहे.
हवामान अंदाज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : विदर्भात यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाची तूट कायम असून, १ जून ते २७ जुलै या कालावधीत संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये सरासरी २६ टक्के पावसाची कमतरता नोंदविण्यात आली आहे. विदर्भात आतापर्यंत सरासरी ४४६ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ३३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाने जोर न धरल्यास जलाशय आणि शेतीच्या पाण्याची परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील सर्वाधिक पावसाची तूट गडचिरोली जिल्ह्यात नोंदवण्यात आली आहे. १ जून ते २७ जुलैदरम्यान गडचिरोलीत तब्बल ३८ टक्के पावसाची तूट आहे. या कालावधीत ५९९ मिमी पाऊस अपेक्षित असताना केवळ ३७३ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल आणि ग्रामीण भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पावसाची कमतरता चिंतेचा विषय ठरत आहे. वाशीम जिल्ह्यातही ३५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. येथे ३८५ मिमी पाऊस अपेक्षित असताना केवळ २५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यात ३२ टक्के, चंद्रपूरमध्ये ३१ टक्के आणि अकोला जिल्ह्यात २८ टक्के पावसाची तूट आहे. यवतमाळ जिल्ह्यातही सरासरीच्या तुलनेत २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर नागपूर जिल्ह्यातही पावसाची स्थिती समाधानकारक नाही. नागपूरमध्ये आतापर्यंत ३५५ मिमी पाऊस झाला असून, सरासरी ४५३ मिमीच्या तुलनेत ही २२ टक्के तूट आहे.
दरम्यान, मागील चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा विदर्भात सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मंगळवारपासून आणि त्यानंतरच्या काळात अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषता आज आणि उद्या विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता असली तरी, अतिवृष्टीमुळे काही भागांत पूरस्थिती आणि शेतीचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा