Kumar Sanu : कुमार सानू यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्याचा अनुभव सांगितला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – कुमार सानू यांनी आजवर अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. आजही त्यांच्या गाण्याची क्रेझ कायम आहे. अंडरवर्ल्डमध्येही कुमार सानू यांचा चाहतावर्ग होता. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कुमार सानू यांनी अंडरवर्ल्डच्या कार्यक्रमाचा अनुभव शेअर केला आहे.
कुमार सानू यांनी सांगितला अनुभव
९० च्या दशकातील सुपरहिट गायक कुमार सानू यांनी अलीकडेच सांगितलं की, जेव्हा त्यांना दुबईतील एका अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत परफॉर्म करण्यास सांगितलं गेलं, तेव्हा त्यांना जीवाची भीती वाटली होती. कुमार सानू म्हणाले की, परफॉर्म करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. सुभोजीत घोषला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुमार सानू म्हणाले की, ‘त्यावेळी जीवाची खूप भीती वाटत होती. कारण त्यावेळी एक वेगळ्याच प्रकारची सिस्टिम सुरू होती आणि खूप साऱ्या घटना आमच्यासमोर घडत होत्या. त्यावेळी गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.’ Raunaq Rajani : ‘CJP आंदोलनादरम्यान पोलिसांची पत्नीला जबर मारहाण’, कॉमेडियनचा दावा, Video शेअर करत दाखवला पुरावा
अंडरवर्ल्डचे डॉन कुमार सानू यांचे चाहते होते
पुढे कुमार सानू म्हणाले, ‘अशा घटनांमुळे प्रत्येक कलाकाराच्या मनात भीती होती. आमच्याबरोबर असं काही होऊ नये, म्हणून आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होतो. अनेकदा आम्हाला त्यांच्या पार्टीत किंवा कार्यक्रमात गाण्यासाठी बोलावलं जायचं, त्या परिस्थितीत आम्हालाही ते करावं लागलं आहे आणि मीदेखील त्यांच्या पार्टीत गाणी गायली आहेत. ते स्वतःला माझे चाहते असल्याचं सांगायचे. इतकंच नाही तर ‘कोणी त्रास दिला तर आम्हाला सांगा, आम्ही बघून घेऊ’ असंही म्हणायचे. मात्र, मी त्यांना नम्रपणे सांगायचो, ‘माझ्यासाठी काही करण्याची गरज नाही, मी माझं स्वतः सांभाळून घेईन.’
दरम्यान, कुमार सानू ‘एक सनम चाहिए’, ‘दिल का आलम’, ‘धीरे धीरे से मेरी जिंदगी में आणा’. ‘चुरा के दिल मेरा’, ‘तुझे देखा तो ये जाना सनम’, ‘धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना’, ‘ये काली काली आँखें’ यांसारख्या गाण्यांसाठी ओळखले जातात.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा