Headlines

Apara Mehta : ‘तू माझ्या आयुष्यातील कुरूप स्त्री’, लग्नाच्या वाढदिवशीच पतीकडून अपमान; २० वर्षांपासून नवऱ्यापासून वेगळी राहतेय अभिनेत्री


Apara Mehta On Her Husband : टीव्ही अभिनेत्री अपारा मेहता यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पती दर्शन जरीवाला यांच्यापासून वेगळं राहण्याचं कारण सांगितलं आहे.

Apara Mehta On Husband Darshan Jariwala
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ आणि ‘जमाई राजा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अपारा मेहता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते दर्शन जरीवाला यांच्यासोबतच्या त्यांच्या लग्नाबद्दल भाष्य केलंय. अभिनेत्रीनं सांगितलं की, ती आणि तिचा पती २० वर्षांपासून वेगळे राहत आहेत.

मुलाखतीदरम्यान अपारा मेहता यांनी सांगितलं की, त्या अमेरिकेत असताना दर्शन जरीवाला यांनी त्यांना फोन केला होता. अभिनेत्रीला याची कल्पनाही केली नव्हती. दर्शन यांनी फोनवर सांगितलं की त्यांना बोलायचं आहे. दर्शन जरीवाला यांना त्यांच्याशी नक्की कशाबद्दल बोलायचं आहे. त्या दिवशी अपारा मेहता आणि दर्शन जरीवाला यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. अपारा म्हणाल्या की, ‘मी माझ्या शो नंतर अमेरिकेतून परत आले. मी पहाटे ३ वाजता उतरले, पहाटे ५ वाजता घरी पोहोचले आणि माझी शिफ्ट सकाळी ७ वाजता होती. दर्शन सहज म्हणाला, ‘बघ अपारा, आपण वेगळं व्हायला पाहिजे. कारण, माझं तुझ्यावर आता प्रेम नाही. तू मला आता आवडत नाहीस आणि तू माझ्या आयुष्यातली सर्वात कुरूप स्त्री आहेस.’
Maharashtra TimesShagufta Ali : 26 वर्षाचं रिलेशनशिप, बॉयफ्रेंडचं अकाली निधन; सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग, म्हणाली, ‘मी खूप रडायचे’
अपारा पुढे म्हणाल्या की, ‘दर्शन सकाळी चहाचा कप घेऊन झोपाळ्यावर बसला होता आणि मी माझ्या शूटिंगसाठी निघाले होते. त्या दिवशी मला तीन मोठे सीन शूट करायचे होते. मी पहाटे ५ वाजताच अमेरिकेतून परत आले होते, त्यामुळे दोन टेक्सच्या मध्ये मला डुलकी लागली. नंतर दुपारी, जेव्हा मला पूर्ण शुद्ध आली, तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘दर्शन आता काय म्हणाला? त्याचा तसा अर्थ नसावा.’

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

‘एक दिवस तो घर सोडून गेला. ते अजूनही आमचंच घर आहे, पण त्याने घर सोडलंय. त्याच्यासाठी घराची दारं नेहमीच उघडी आहेत. तो परत येऊ शकतो. पण मला हेही माहीत आहे की, तो कदाचित परत येणार नाही. त्याला माझ्यासारखं कोणी मिळणार नाही आणि मला त्याच्यासारखं कोणी मिळणार नाही. आणि हो, जरी आम्ही वेगळे राहत असलो तरी, आम्ही एकमेकांचा आदर करतो. आम्ही अजूनही एकमेकांच्या इच्छा पूर्ण करू शकतो.’ असंही अपारा यांनी पुढे सांगितलं. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अपारा मेहता बोलत होत्या.
Maharashtra TimesRajesh Khanna : दत्तक घेतल्याचं समजताच बसला धक्का, सख्ख्या बहिणीनंही केलं परकं, लोकांवरचा विश्वास उडाला; राजेश खन्ना यांच्याबद्दल एक्स गर्लफ्रेंडचा दावा
दरम्यान, अपारा मेहता आणि दर्शन जरीवाला यांनी १९८० मध्ये लग्न केलं आणि त्यानंतर १९८१ मध्ये, त्यांनी कुटुंबाच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. त्यांना खुशाली नावाची एक मुलगी आहे. दर्शन जरीवाला आणि अपारा २००३-२००४ मध्ये वेगळे झाले. त्यांचा घटस्फोट झालेला नाही, पण ते अजूनही वेगळे राहतात आणि एकमेकांना आधार देतात.