Headlines

Rohit Pawar Supports NEET Protest at Jantar Mantar, Demands CJI Impeachment


राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या ‘कॉकरोज जनता पार्टी’च्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पूर्ण पाठिंबा जाहीर केला. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजीत द

.

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी मागील एक महिन्यापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहे. या आंदोलनादरम्यान २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. मात्र, या मोर्चावेळी दिल्ली पोलिस आणि आरएएफ कडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आता विविध विरोधी पक्ष नेते जंतर-मंतरवरील आंदोलनाला भेट देत असून, आपला पाठिंबा देत आहेत. त्यातच रोहित पवार यांनी आज या आंदोलनाला भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त मागणी केली आहे.

नेमके काय म्हणाले रोहित पवार?

न्यायव्यवस्थेबाबत बोलताना रोहित पवार यांनी सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले. “आमचा सर्वोच्च न्यायालयावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या पवित्र पदावर आमचा विश्वास आहे, पण सध्या त्या पदावर बसलेल्या सरन्यायाधीशांवर आमचा अजिबात विश्वास उरलेला नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपदावरून हटवलेच पाहिजे, पण त्यासोबतच सरन्यायाधीश लोकशाहीच्या विरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर संसदेतून महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी नम्र विनंती मी राहुल गांधी यांच्याकडे करत आहे,” असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचे पोलिसांचे षडयंत्र

दिल्लीतील या सत्याग्रहाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगताना रोहित पवार यांनी पोलिसांच्या कारभारावर आणि लाठीचार्जवर परखड मत मांडले. ते म्हणाले, “नीट पेपरफुटीनंतर सुरू झालेल्या या सत्याग्रहात मी पहिल्यांदाच जंतर-मंतरवर आलो. इथे विद्यार्थी, पालक, माजी सैनिक सिस्टिमविरोधात एकत्र आले आहेत. यामुळे केंद्र सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.”

फोडलेल्या गाड्यांचा बनाव

रोहित पवार म्हणाले, “आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवेळी २० तारखेच्या आधीच फुटलेल्या काही गाड्या पोलिसांनी तिथे आणून ठेवल्या होत्या. या आंदोलक विद्यार्थ्यांनीच गाड्या फोडल्या आहेत, असे दाखवण्याचा पोलिसांचा डाव होता. आजही किंवा उद्याही विद्यार्थ्यांवर आळ आणण्यासाठी असाच प्रयत्न केला जाऊ शकतो.”

पोलिसांना स्वतःच्या बहिणी किंवा मुली नाहीत का?

आंदोलक महिला आणि विद्यार्थिनींवर झालेल्या अमानुष लाठीचार्जवरूनही रोहित पवार यांनी पोलिसांना सुनावले. “नेत्यांच्या बाजूने भूमिका घ्यायची हे काम अंधभक्त करतात. पोलिसांना स्वतःच्या बहिणी किंवा मुली नाहीत का? निष्पाप विद्यार्थ्यांवर असा अमानुष लाठीचार्ज करताना तुम्हाला कसलीच संवेदनशीलता उरली नाही का?” अशी विचारणा रोहित पवार यांनी पोलिसांना केली.

हे ही वाचा…

आमची लेक गेली, पण साधी विचारपूसही नाही:मोदी-प्रधानांनी राजीनामा दिलाच पाहिजे, आत्महत्या केलेल्या आकांक्षाच्या आईचा टाहो

‘नीट’ परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीला कंटाळून आत्महत्या केलेल्या नागपूरची विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदी हिच्या आई नीलम चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “आमची लेक गेली, पण सरकारमधील एकाही मंत्र्याने किंवा नेत्याने साधा फोन करून विचारपूस करण्याचे सौजन्य दाखवले नाही. आमचे दुःख जाणून घ्यायला कोणीच आले नाही,” असा आक्रोश व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सविस्तर वाचा…

सरकारने हात पुढे केलाय, तुम्हीही हात द्या:भांडणे थांबवा, संवादाने मार्ग काढा; विद्यार्थी आंदोलनावर अभिनेते प्रशांत दामले यांचे आवाहन

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोज जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि वाढत्या तणावावर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी आपली भूमिका मांडत सर्व संबंधितांना शांततेचे आणि संवादाचे कळकळीचे आवाहन केले आहे. “मला भांडणे किंवा मारामारी अजिबात आवडत नाही. मात्र, आजूबाजूची परिस्थिती पाहता आता व्यक्त होणे गरजेचे झाले आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य जपण्यासाठी हे भांडण तात्काळ थांबवून चर्चेच्या माध्यमातून विषय संपवण्याची नम्र विनंती केली आहे. सविस्तर वाचा…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत