Headlines

Aditya Thackeray | आंदोलन तुम्ही करा, गुन्हे आम्ही घेतो आदित्य ठाकरे यांची तरुणांना ग्वाही


त.भा. प्रतिनिधी, मुंबई :
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे रविवारी दादर येथे मोर्चा काढणार आहेत, तर त्याची पूर्वतयारी म्हणून शिवाजी पार्क येथे आदित्य आणि अमित ठाकरे या ठाकरे बंधूंनी तिरंगा रॅली काढली. यावेळी तरुणाई मोठ्या संख्येने जमा होती. या तरुणाईचा हुरूप वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आंदोलन स्थळावरूनच दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करत असलेल्या अभिजीत दिपिकेना फोल लावला आणि त्यांचे संभाषण तरुणाईला ऐकवले.

जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार अभिजीत दिपिके यांनी बोलून दाखवला. त्यामुळे तऊणाईचा हुरूपही वाढला. आदित्य ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्यासोबत संवाद साधताना राजीनामा घेऊनच व्यवस्था बदलायची आहे. हा नवा भारत आहे, झुकणार नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. मुंबईत तर या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली असली तरी विद्यार्थी आंदोलकांकडून या जमावबंदीच्या विरोधात जात आंदोलन करण्यात येत आहे.

तर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आता ठाकरे बंधूंचाही पाठिंबा मिळाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले असून पोलिसांकडून केस फाईल होणार्या विद्याथ्याऱ्या सोडवण्याचे काम करत आहेत. अशातच आज या विद्यार्थ्यांसाठी आदित्य ठाकरेंनी तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते.

या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहिले होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी मार्गदर्शन करताना तुम्ही आंदोलन करा, गुन्हे आम्ही घेतो, असे आश्वासित केले.
तऊणाईच्या या आंदोलना ना मनसेचा, ना शिवसेना ठाकरे गटाचा झेंडा होता. फक्त तिरंगा फडकत होता. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी तिरंगा फडकवला.

तसेच विद्यार्थी करत असलेल्या आंदोलनाची प्रशंसा केली. शिवाजी पार्क परिसरात आज नीट पेपरफुटीच्या मुद्यावऊन पेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तऊणाई मोठ्या प्रमाणावर जमली होती. तऊणांकडून तिरंगा हाती घेत राष्ट्रगीत गायन केले. या प्रसंगी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शर्मिला ठाकरे, तुषार गांधी, अभिनेता अतुल कुलकर्णी सहभागी झाले होते.
सरकारच्या हातात बंदुका, लाठी पण आमच्या हातात तिरंगा : उध्दव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरात जमलेल्या तऊणाईला मार्गदर्शन केले. या चार दिवसात आपण याच जागेवर दुसऱ्यांदा भेटलो आहोत. परवा दिल्लीला जाऊन आलो, आता रविवारी आपण भेटणार आहोत. आपण सर्व भारतीय आहोत, हीच ओळख आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. जे आजपर्यंत आपली ओळख विसऊन आपल्याला भीती दाखवून राज्य करत होते, त्यांनी हे दृश्य पाहणे गरजेचे आहे. ही जन की बात दिल्लीला ऐकावी लागेल. दिल्लीमध्ये बेछूटपणे विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला झाला. सरकारच्या हातात बंदुका, लाठी असेला पण आमच्या हातात तिरंगा आहे. आम्ही तिरंगा घेऊन तुमच्यासमोर आहोत, बघू तिरंगा जिंकतो की तुमची हुकूमशाही जिंकते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले आहे, मात्र आंदोलन संपलेले नाही. अभिजित दिपके आणि इतर युवक दिल्लीत आंदोलन करत आहेत. आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. तोपर्यंत शांत बसायचं नाही, असेही आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.
तर ही वेळ आली नसती : अमित ठाकरे
अमित ठाकरे म्हणाले की, सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले असले तरी, सरकारने मागण्या आधीच मान्य केल्या असत्या तर विद्यार्थ्यांवर ही वेळ आली नसती. मुलींचे कपडे फाडणे, मुलांना खिळे मारणे याला सरकार जबाबदार आहे. शिक्षणमंर्त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील, असा इशारा त्यांनी दिला.
जर विद्यार्थी समाधानी, सुरक्षित नसतील तर आम्ही उतरणार, त्यांच्यावर हात उचलू देणार नाही, असेही ते म्हणाले. ही त्यांच्या हक्काची लढाई आहे, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. त्यांना जेव्हा समाधाना वाटेल ही लढाई संपेल, असे त्यांनी ठामपणे सांगितलं. पदाधिकार्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी ही भूमिका मांडली.
जोपर्यंत विद्यार्थी आमच्यासमोर रस्त्यावर उतरत आहेत तोपर्यंत शिक्षणमंत्री प्रधानांनी राजीनामा दिलाच पाहिजे. हे कोणत्याही एका पक्षाचे आंदोलन नाही. लोक स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरलेत आणि त्यामुळे आता सरकार कुठेतरी बॅकफूटवर गेले आहे, असं अमित ठाकरे म्हणाले



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत