Headlines

Police raid on spa center in pune bust of racket; पुण्यातील हायप्रोफाइल परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली धक्कादायक प्रकार; पोलिसांनी धाड टाकत केली ३ तरुणींची सुटका


Pune News: पोलिसांनी हडपसर परिसरात कारवाई करत तीन तरुणींची सुटका केली असून आरोपींना अटक केली आहे. तसंच याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

पोलिसांची धाड (प्रातिनिधिक फोटो)
पुण्यातील हायप्रोफाइल परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली धक्कादायक प्रकार(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: पुणे शहर आणि परिसरात मागील काही महिन्यांपासून पोलिसांकडून अवैध धंद्यांवरील कारवाईला वेग आला आहे. अशातच हायप्रोफाइल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा परिसरातील स्पा सेंटरवर हडपसर पोलिसांनी छापा टाकून चालणाऱ्या देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईत ३ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून स्पा मालकिणीसह मॅनेजरविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मगरपट्टा येथील सिझन्स मॉलसमोरील ‘द कॉस्मो पॉलिस’ इमारतीमध्ये ‘द फॉरेव्हर’ नावाचे स्पा सेंटर चालवले जात होते. मसाज आणि स्पाच्या नावाखाली इथं तरुणींना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना या स्पा सेंटरमध्ये काळे धंदे सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. सदर माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ एक बनावट ग्राहक पाठवत खात्री केली. त्यानंतर तिथे अनैतिक प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट होताच हडपसर पोलिसांच्या पथकानं अचानक छापा टाकला व या काळ्या धंद्याचा भांडाफोड केला.

दरम्यान, या प्रकरणी स्पा मालकीण अश्विनी मुरडे (रा. कल्याणीनगर) आणि मॅनेजर रकबुल अबुल हुसेन यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार बाबू लोणकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून या दलदलीत ढकलत असत आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका भागवत असल्याचं तपासात उघड झालं आहे. हडपसर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर स्पा सेंटर चालकांचे धाबे दणाणले असून पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा