Headlines

Simple Kaul : ‘हॉटेलमध्ये मला एकटीला भेटायला बोलावलं’, ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव


Simple Kaul Casting Couch : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम सिंपल कौलनं कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितलाय.

Simple Kaul On Casting Couch Experience
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – टीव्ही अभिनेत्री सिंपल कौल ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ या मालिकेत गुलाबोची भूमिका साकारून चर्चेत आली होती. अलीकडेच, या अभिनेत्रीनं कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला आहे .

सिंपल कौलचा कास्टिंग काउचचा अनुभव

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत, सिंपल कौलनं तिच्या संघर्षाबद्दल सांगितलं. अभिनेत्रीनं सांगितलं की, जेव्हा ती मुंबईत आपल्या करिअर करण्यासाठी आली, तेव्हा तिनं नेहमीच आपल्या वैयक्तिक मर्यादा कायम ठेवल्या. सिंपल म्हणाली की, तिला कधीही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला नाही, कारण इंडस्ट्रीतील लोकांना केव्हा, कुठे आणि कसं भेटावं याबद्दल ती नेहमीच काळजी घ्यायची.
Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra फेम निमिष कुलकर्णीची भरारी! अभिनेत्याची मराठी सिनेमात वर्णी; चाहते उत्सुक
सिंपल कौल म्हणाली, ‘मी सुरुवातीपासूनच खूप हुशार आणि स्पष्टवक्ती होते. कोणी माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच, मी त्यांना सडेतोड उत्तर द्यायचे.’ एका घटनेची आठवण सांगताना अभिनेत्री म्हणाली की, एका चित्रपट निर्मात्यानं तिला रात्री ८:३० ते ९:०० च्या सुमारास हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं होतं.
सिंपल म्हणाली, ‘मी त्याला सांगितलं की मी माझ्या मैत्रिणींसोबत येईन. तो म्हणाला की, ‘तुझ्या मैत्रिणी खाली बसू शकतात आणि तू वर येऊ शकतेस.’ पण मी स्पष्टपणे नाही म्हणाले, जर तुम्हाला भेटायचं असेल, तर लॉबीमध्ये भेटा. माझे स्वतःचे नियम होते आणि मी त्यांच्याशी कधीही तडजोड केली नाही.’ अभिनेत्री म्हणाली की, कामासाठी ती तिच्या तत्त्वांशी कधीही तडजोड करण्यास तयार नव्हती.

नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत

नवीन कलाकारांना सल्ला देताना सिंपल म्हणाली, ‘जर तुम्हाला काहीतरी चुकीचं आहे असं वाटलं, तर ताबडतोब तिथून निघून जा. स्वतःला कोणत्याही वाईट परिस्थितीत टाकण्याची गरज नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, ऑडिशन द्या, लोकांना प्रोफेशनली भेटा आणि तुमच्या कलेवर कठोर परिश्रम करा. यश मिळवण्यासाठी तुमच्या तत्त्वांशी तडजोड करण्याची गरज नाही.’
Maharashtra TimesUjjwal Nikam On Sanjay Dutt : ‘संजय दत्त 1993 चा बॉम्बस्फोट थांबवू शकला असता, तो दहशतवादी नव्हता’, उज्ज्वल निकम यांचा दावा

सिंपल कौलनं २००२ मध्ये एकता कपूरच्या ‘कुसुम’ या शोमधून अभिनयात पदार्पण केलं. ‘शरारत’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ यांसारख्या मालिकांमुळे तिला घरोघरी ओळख मिळाली.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा