Headlines

Gold-Silver Prices Today 21 July 2026; सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव वधारलेलाच, चांदीचा आलेख चढा; ‘वॉर कनेक्शन’ की आणखी काही? दरवाढीचे कारण काय?


Today’s Gold-Silver Price 21 July 2026: सोने आणि चांदीच्या खरेदीदारांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. मंगळवार, 21 जुलै रोजी, देशभरात सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात वाढ झाली असून सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारातील दरवाढीचा आलेख चढाच राहिला आहे.

Gold-Silver Prices Today 21 July 2026
सोन्या-चांदीच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Gold-Silver Prices: सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिरवीगार तेजी कायम राहिली आहे. देशांतर्गत बाजारात तसेच COMEX वर सोने-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली असून यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला असेल. मंगळवार, 21 जुलै रोजी, सराफा बाजारात खरेदीचा कल पाहायला मिळाला असून MCX वर वायदा किंमतीत वाढ झाली असून तुमचा आज खरेदीचा कोणताही प्लॅन असेल तर त्याआधी 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत तपासून घेणे महत्त्वाचे आहे.

सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ

मध्य-पूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांच्या हालचाली आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट यामुळे मौल्यवान धातूंसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मंगळवारी, 21 जुलै रोजी सकाळी MCX वर सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास MCX वर ऑगस्ट सोन्याचा वायदा भाव 0.63% वाढून 1,42,279 रुपयांवर उसळला तर, सप्टेंबर चांदीचे कॉन्ट्रॅक्ट 1.11% वाढीसह 2,20,825 रुपयांवर पोहोचले.

Maharashtra TimesLTCG Tax Removal Explained: लाँग टर्म भांडवली नफा करात दिलासा नाही! शेअर बाजाराचा ‘व्हिलन’ LTCG कर काढून टाकल्यास तुमचा किती फायदा?
अशाप्रक्रारे, सध्या भारतातील सराफा बाजारांमध्ये 24 कॅरेट सोने 1,43,470 रुपये, 22 कॅरेट 1,31,510 रुपये आणि 18 कॅरेट सोने 1,07,600 रुपयांना उपलब्ध आहेत. यावर ग्राहकांना घडणावळ शुल्क आणि 3% जीएसटी देखील आकारला जाईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची किंमत

महागाईवर ऊर्जा दरांच्या परिणामाबद्दल संकेत मिळवण्यासाठी व्यापारी मध्य पूर्वेतील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याने जागतिक बाजारात घसरणीच्या वेळी झालेल्या खरेदीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. दुसरीकडे, अमेरिकन दलांनी इराणी लक्ष्यांवर नव्याने हल्ले करूनही सलग 2 दिवस वाढल्यानंतर तेलाच्या किमतीत घट झाली.

Maharashtra TimesEthanol in LPG : कार-बाइकनंतर आता इथेनॉलची किचनमध्येही एन्ट्री! गॅस बिल कमी करण्याचा दावा करून सरकारचा नेमका प्लॅन काय ते समजून घ्या
इराणला लक्ष्य करून केलेल्या हवाई हल्ल्याच्या फेरीला अमेरिकेने ब्रेक लावला आणि ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल 90 डॉलर्सच्या खाली आल्यानंतर अमेरिकेत सोन्याच्या दरातही वाढ झाली. मात्र, तरीही मध्यपूर्वेत संघर्ष संपवण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची चिन्हे दिसत असूनही तणाव कायम आहे.

Maharashtra TimesProperty Rules: जमीन, मालमत्तेच्या वादात पोलीस कारवाई बेकायदा कशी? तुमचे हक्क काय? यावर काय सांगतो कायदा जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची अस्थिरता आणि गुंतवणूकदारांच्या धोरणांचा भविष्यात सोने आणि चांदीच्या किमतींवर परिणाम होण्याची तज्ज्ञ सतत भाकीत करत आले आहेत. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि डॉलरच्या हालचालींनुसार सोने-चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार होऊ शकतात, त्यामुळे गुंतवणूक किंवा खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांना बाजारावर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो.