Headlines

‘आता मी कुणाशी खेळणार?’ समृद्धीवरील अपघातात आई-वडिलांसह जुळ्या बहिणीला गमावलं; तन्वीच्या प्रश्नापुढे सारेच अबोल| Maharashtra Times


Wardha Accident: समृद्धी महामार्गावर आयशर ट्रक एका चारचाकीला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा करूण अंत झाला. कारमधील कुटूंब आपल्या लेकीला पुण्याला सोडून वर्धा येथे परतत असताना नियतीने घात केला.

समृद्धी महामार्ग अपघातांत सहा जणांचा अंत
म.टा. वृत्तसेवा, वर्धा: सालोड हिरापूरच्या राजेश टिपले यांना तन्वी आणि जान्हवी या दोन जुळ्या मुली होत्या. जुळ्या असल्याने दोघींमध्ये अतूट नाते होते. एकमेकींशिवाय दोघीही राहत नव्हत्या. पण, शिक्षणासाठी तन्वीला पुण्यात थांबावे लागले. वीरुळजवळील अपघातात अवघे टिपले कुटुंब संपले. तन्वी पुण्यात असल्याने ती बचावली. पण, आता मी कुणाशी खेळणार, कुणाला विचारणार, कुणाला बोलणार या तिच्या प्रश्नांनी सारेच अबोल झाले होते.

परतीचा प्रवास अखेरचा ठरला

मुलीला पुण्यात सोडल्यावर परतीच्या मार्गाने निघालेल्या राजेश आणि आई सुषमा टिपले यांनी लेकीला हृदयाशी घेत पुन्हा लवकरच येऊ असे सांगत परतीची वाट धरली. वर्ध्याच्या दिशेने निघाले. गाडी दूरवर जाईपर्यंत तन्वी साऱ्यांना पाहत राहिली. वाटेत तन्वीच्या आठवणी सांगत गप्पागोष्टीत कुटुंब रमले. पण नियतीला मात्र काही तरी वेगळेच मंजूर होते. वर्ध्याकडे परतणाऱ्या कुटुंबावर समृद्धी महामार्गावर काळाने घाला घातला. अवघे कुटुंब उद्ध्वस्त झाले. परतीचा हा प्रवास आयुष्याचा अखेरचा ठरला. तन्वी आता पोरकी झाली आहे. अपघातात आईवडील आणि बहीण गेली. आज त्या मुलीसोबत केवळ आईवडिलांच्या आठवणी शिल्लक आहेत.

Maharashtra TimesSamruddhi Expressway Wardha Accident: लेकीला MBAसाठी पुण्यात सोडून घरी निघाले, वाटेत ट्रकच्या धडकेत सहा जणांचा करूण अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

कारचालक अंकुश राऊत हा ऑटो आणि चारचाकी गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. तोदेखील या अपघातात ठार झाल्याने त्याची पत्नी, एक वर्षाची मुलगी, आईवडील, भाऊ यांचा आधार हिरावला गेला आहे. गावातील चार जीव एकाच अपघातात गेल्याने सोमवारी अपघे गाव अबोल झाले. गावातील कुणीही आज शेतावर गेला नाही. कुणी कामावर गेले नाही.

दरम्यान, वीरूळनजीक चॅनेल क्रमांक ७९जवळ इथेनॉल भरून असलेला ट्रक उलटल्याने नागपूर कॉरिडोरची वाहतूक थांबवून मुंबई कॉरिडोरने सोडण्यात आली. एकाच दिशेने नागपूरच्या दिशेने येणारी आणि जाणारी अशी दोन्ही वाहतूक सुरू होती. वाहनांची वर्दळ अधिक असल्याने कार चालकाचा गोंधळ उडून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी अपघात झाला. त्या घटनास्थळापासून दीडशे मीटर अंतरावर रात्री इथेनॉल घेऊन जाणारा टँकर उलटला होता. या टँकरमधून इथेनॉलची गळतीदेखील झाली. इथेनॉल गळत असल्याने वाहतूक दुसऱ्या लेनमधून वळविण्यात आली होती. टँकर उचलेपर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला. पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्तदेखील लावला होता. रस्त्यावर इथेनॉल सांडल्याने एखादे वाहन पेट घेण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात होती. सोमवारी दुपारी या टँकरला उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. तर हा टँकर पेट घेऊ नये यासाठी त्यावर पाण्याचादेखील मारा करण्यात आला आहे. टँकर उचलण्यात आला असून या टँकर उलटण्यामुळे मात्र या भागात वाहतुकीत मोठी अडचण निर्माण झाली होती.

Maharashtra TimesMumbai BEST Bus Accident: ‘खिशात फक्त २०० रुपये, उपचार कसे करू?’ बेस्ट अपघातानंतर जखमी हतबल; बस व्हिडीओ गेमसारख्या वेगात चालवल्याचा दावा

इथेनॉलचा उलटलेला टँकर धोकादायक

समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी अपघात झाला. त्या घटनास्थळापासून दीडशे मीटर अंतरावर रात्री इथेनॉल घेऊन जाणारा टँकर उलटला होता. या टँकरमधून इथेनॉलची गळतीदेखील झाली. इथेनॉल गळत असल्याने वाहतूक दुसऱ्या लेनमधून वळविण्यात आली होती. टँकर उचलेपर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला. पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्तदेखील लावला होता. रस्त्यावर इथेनॉल सांडल्याने एखादे वाहन पेट घेण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात होती. सोमवारी दुपारी या टँकरला उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. तर हा टँकर पेट घेऊ नये यासाठी त्यावर पाण्याचादेखील मारा करण्यात आला आहे. टँकर उचलण्यात आला असून या टँकर उलटण्यामुळे मात्र या भागात वाहतुकीत मोठी अडचण निर्माण झाली होती.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा