- Marathi News
- International
- Missile Attack On Cargo Ship In Ukraine; 4 Indians Killed, One Injured, Ukraine Claims Russia Attacked, 17 Crew Members On Board
नवी दिल्ली / कीव्ह3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

युक्रेनमधील ओडेसा बंदरावर मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्य तर एक भारतीय जखमी झाला. आफ्रिकेतील गिनी-बिसाऊ देशाचे ‘गोल्डन लियो’ हे जहाज गहू घेऊन जात होते. जहाजावर १७ कर्मचाऱ्यांचा ताफा होता. युक्रेनच्या नौदलाने या हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरले आहे.
युक्रेनच्या म्हणण्यानुसार, रशियाने तीन क्षेपणास्त्रे डागली होती. त्यापैकी दोन क्षेपणास्त्रे हवेतच निष्प्रभ करण्यात आली. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोमवारी सायंकाळी निवेदन जारी करून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. युक्रेनमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रभावित भारतीयांना शक्य ती सर्व मदत पुरविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
रशिया-युक्रेन युद्ध : आतापर्यंत ५५ भारतीयांचा मृत्यू
साडेचार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत ५५ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. २०२२ मध्ये युक्रेनमधील खारकीव्ह येथे दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तसेच रशियन सैन्यात सहभागी होऊन युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढणाऱ्या ४९ भारतीय युवकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार रशियन सैन्यातून १३९ भारतीयांची सुटका करण्यात आली.
