Headlines

Gold and Silver Price Surge 20 July 2026; आठवड्याभराच्या घसरणीनंतर सोने-चांदीचा दर वाढला, काय आहे आजचा रेट? युद्धाच्या सावटात खरेदीचा पॅटर्नच बदलला


Todays’ Gold-Silver Rates: सोमवार, आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी, सोने आणि चांदीच्या दरांमधील घसरता आलेख कायम राहिला आहे. प्रमुख आशियाई बाजारांमध्ये सोन्याच्या प्रत्यक्ष मागणीत घट दिसून आली असून भारतात दागिन्यांची मागणी मंदावली आणि किमती कमी होण्याची शक्यतेमुळे अनेकांनी पाठ फिरवली असून सोन्यावरील सवलतींचे प्रमाण गेल्या महिनाभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचले.

सोने-चांदीच्या दरांवर गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या लाल रंगाचे वर्चस्व पाहायला मिळत असून MCX, COMEX तसेच भारतातील सराफा आणि आंतरराष्ट्रीय स्पॉट किंमतीतील चढ-उतारांनी गुंतवणूकदारांना जोरदार धक्का बसला आहे.

Maharashtra TimesCrude Oil Price Hike Shock: धोक्याची घंटा! तेलाच्या किमती पेटल्या; पेट्रोलपासून किराणा वस्तूपर्यंत सगळं महागणार? जगाची तेलकोंडी होण्याची चिंता वाढली

सोने-चांदीचा आजचा दर काय

20 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदार अमेरिकेतील व्याजदरांविषयी नवीन संकेतांसाठीअमेरिकेतील साप्ताहिक बेरोजगारीचे दावे आणि PMI, तसेच युरोप आणि चीनमधील चलनविषयक धोरणाचे निर्णय आणि प्रमुख आर्थिक निर्देशांक यासारख्या महत्त्वाच्या डेटावरही लक्ष ठेवून असतील.

यादरम्यान सोमवारी, 20 जुलै रोजी, सकाळी 9.15 वाजता MCX वर सोन्याचा वायदा दर 0.39 टक्के वाढून 1,41,460 रुपयांवर वाढला तर, चांदीचा दर 3,033 रुपयांनी किंवा 1.45o वाढून 2,19,425 रुपये किलोवर पोहोचला आहे.

Maharashtra TimesMumbai Property News: 30000 रुपयांऐवजी 50 हजार रजिस्ट्रेशन फी? मुंबईत घर खरेदी महागणार; गृहखरेदीदारांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता

सोने-चांदीच्या दरांवर परिणाम करणारे घटक

मौल्यवान धांतूंचा बाजार सध्या दोन परस्परविरोधी हालचालींमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे पश्चिम आशियातील वाढती भू-राजकीय अनिश्चितता तर दुसरीकडे, कठोर चलनविषयक धोरणाची अपेक्षा वाढे आहे.

अलीकडेच जॉर्डनमधील अमेरिकेशी संबंधित आस्थापनांवरील हल्ल्यांनंतर इराणवर वॉशिंग्टनच्या हवाई हल्ल्यांमुळे मध्य-पूर्वेतील तणाव वाढला, ज्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले. त्याचवेळी,आगामी फेड रिझर्व्हच्या बैठक आणि व्याज दरांबाबत धोरणकर्त्यांच्या टिप्पण्यांवर सर्वांचे लक्ष केंद्रित असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Maharashtra TimesWomen’s Property Rights: पत्नीला माहेरून मिळालेल्या संपत्तीवर पती अन् सासरच्यांचा किती हक्क? जाणून घ्या नियम, नाहीतर अडचणीत याल
याशिवाय चीनमधील प्रीमियम दरात फारसा बदल झालेला नाही, पण किरकोळ मागणीत घट झाल्याचं दिसून येत आहे. प्रत्यक्ष खरेदीतील या कमजोरीमुळे बुलियन किमतींवरील दबाव वाढला आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा व्याज दरांबाबत अपेक्षा आणि भू-राजकीय घडामोडींमुळे जागतिक गुंतवणूकदार आधीच सावध पवित्रा घेत आहेत. भारत आणि चीन जगातील सोन्याचे सर्वात मोठे ग्राहक देश असून या दोन्ही देशांमधील मागणीच्या कलकडे बारकाईने लक्ष ठेवले जाते.