Headlines

वर्ल्ड कप फायनल हरल्यावरही अर्जेंटिनाला 318 कोटींची बक्षिसं, तर विजेत्या स्पेनवरही पैशांचा पाऊस, किती मिळाले?


FIFA World Cup 2026 Final Prize Money News : फिफा वर्ल्ड कप २०२६च थरार रविवारी मध्यरात्री पार पडला. या सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाला पराभवाची धूळ चारत सामना जिंकला. पराभूत झाल्यावरही अर्जेंटिनाला 318 कोटींचं बक्षीस मिळालं असून विजेत्या संघाला किती मिळाले जाणून घ्या.

FIFA World Cup 2026 Final Prize Money
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : फिफा वर्ल्ड कप २०२६च्या फायनलमध्ये स्पेनने अतिरिक्त वेळेत केलेल्या एको गोलने अर्जेंटिनाचा १-० ने पराभव केला. या सामन्यात झालेल्या पराभवामुळे गतविजेत्या अर्जेंटिनाचं सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. स्पेनने तब्बल १६ वर्षांनी दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरत इतिहास रचला. विजेत्या संघाला फक्त ट्रॉफीच नाहीतर बक्कळ पैसाही बक्षीसाच्या स्वरूपात मिळणार आहे. फक्त विजेत्याच नाहीतर वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला फिफा रक्कम देतं, विजेत्या संघावर तर पैशांचा पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी वर्ल्ड कपवर नाव कोरणाऱ्या स्पेनला ५० मिलियन डॉलर तर उपविजेत्या अर्जेंटिनाला संघाला ३३ मिलियन डॉलर मिळणार आहेत.कोणत्याही स्पर्धेमधील विजेत्यांना मिळणारी सर्वाधिक रक्कम आहे. यंदा ८३ मिलियन डॉलर इतके फायनलसाठी बक्षीस ठेवण्यात आले होते.

भारतीय चलनानुसार जर पाहायला गेलं तर स्पेन संघाला ५० मिलियन डॉलरनुसार म्हणजे भारतामधील जवळपास ४८२ कोटी इतकी रक्कम त्यांना मिळणार आहे. तर उपविजेता अर्जेटिना संघाला ३३ मिलियन डॉलर म्हणजेच ३१८ कोटी रूपये मिळणार आहेत. मागील वर्ल्ड कप २०२२मध्ये फिफाकडून विजेत्या अर्जेंटिना संघाला ४२ मिलियन डॉलर मिळाले होते, यंदा या बक्षीसामध्ये ८ मिलियन डॉलरने वाढ झाली आहे. तर उपविजेत्या फ्रान्स संघाला ३० मिलियन डॉलर मिळाले होते. यंदा ३ मिलियन डॉलरने वाढ झाली.
Maharashtra TimesFIFA World Cup Winner 2026 : फुटबॉल वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनची गतविजेत्या अर्जेंटिनावर 1-0ने मात, एम्बापे गोल्डन बूटचा मानकरी

चेंडूवर वर्चस्व स्पेनचेच

स्पेनने सुरुवातीपासूनच चेंडूवर जास्त ताबा राखला होता. सामन्याच्या उत्तरार्धात तर बराचवेळ खेळ हा अर्जेंटिनाच्या हद्दीतच सुरू होता. ‘टिकी-टाका’ या आपल्या खास शैलीत खेळ खेळताना स्पेनने दस्तुरखुद्द लिओनेल मेस्सीलाही गोल करण्यापासून रोखले होते. चेंडूचे छोटे, छोटे पास हुशारीने करत स्पेनने अर्जेटिनाची कोंडी करण्यात यश मिळवले होते. अर्जेटिनाच्या कच्च्या दुव्यांचा अभ्यास करत स्पेनने मेस्सी आणि कंपनीला गोल करण्यापासून रोखले होते. गोलप्रयत्नांत स्पेनचे १७-० असे वर्चस्व होते. त्यातील दहा प्रयत्न गोलपोस्टच्या दिशेने होते. पण १०५व्या मिनिटांपर्यंत गोल झालाच नव्हता.
Maharashtra TimesFIFA World Cup Winner 2026 : विजेतेपदाचे स्वप्न भंगताच अर्जेंटिनाचा पारेडेस आक्रमक, स्पॅनिश खेळाडूंना मैदानातच भिडला, व्हिडिओ समोर
फेरेन टॉरस याने १०६व्या मिनिटास गोल करीत स्पेनला विजयी केले. स्पेनने या सामन्यात निर्धारित तसेच जादा वेळेत गोलसाठी एकूण २० प्रयत्न केले. त्यातील १२ ऑन टार्गेट होते. मार्टिनेझच्या भक्कम गोलरक्षणामुळे स्पेनला वर्चस्वाचे गोलात रूपांतर करण्यासाठी जादा वेळेतील उत्तरार्धापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.