Headlines

IND vs ENG 3rd ODI : गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांसोबत बोलत नाहीत? बॅटिंग कोचने सांगितली आतली बातमी – india batting coach sitanshu kotak talk about rift between virat kohli and gautam gambhir


Gautam Gambhir & Virat Kohli News : भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये अबोला असल्याची चर्चा आहे. कारण सराव सत्रामध्ये दिसते की ते दोघे एकमेकांंशी संवाद साधत नाहीत. अशातच बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी यावर खुलासा केला आहे.

Rohit Sharma Gautam Gambhir
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कार्डिफ : मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्यात संवाद नसल्याच्या वृत्ताला भारतीय संघातील फलंदाजांचे प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी ‘निव्वळ अफवा’ असे संबोधले आहे. सराव सत्रादरम्यान हे दोघे दूर-दूर दिसत असले, तरी ‘दिवसातून दहा वेळा तरी बोलतात,’ असा खुलासा कोटक यांनी केला.

भारतीय संघाला मालिकेतील दुसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून चार विकेटनी पराभव पत्करावा लागला. भारताचा डाव २३३ धावांत आटोपला. यानंतर इंग्लंडने विजयी लक्ष्य ४४.१ षटकांत सहा विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. गंभीर आणि कोहली यांच्यात अबोला असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय या दोघांना एकत्र बसवून मतभेद सोडवण्यासाठी एखाद्या मध्यस्थीची मदत घेणार असल्याची चर्चा होती. बर्मिंगहॅम आणि कार्डिफमधील सराव सत्रांदरम्यानही कोहलीने गंभीरऐवजी कोटक यांच्याशी संवाद साधला.
Maharashtra TimesIND vs ENG : कॅप्टन शुभमन गिलचा फुगीर आत्मविश्वास नडला! पहिल्या मॅचनंतर केलेल्या वक्तव्याने तोंडावर पडला, नेमकं काय बोललेला?
टीम इंडियाचा ३९ वर्षीय सीनिअर सलामीवीर रोहित शर्माचा धावांसाठी संघर्ष कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ४७ चेंडूंत त्याने कूर्मगतीने अवघ्या २६ धावा केल्या. मात्र भारतीय संघाच्या फलंदाजांचे प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी रोहितला खंबीर पाठिंबा देत टीका करणे टाळले.
Maharashtra TimesRohit Sharma : हुश्श! लॉर्ड्सवर रोहितचा अखेरचा वनडे सामना नसेल, BCCI ने चर्चा फेटाळल्या, वर्ल्डकपमधील सहभागावर काय म्हणाले?
कसोटी आणि टी-२० मधून निवृत्त झालेला रोहित आता फक्त आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळतो. गेल्या अकरा लढतींत रोहित शतकाविना आहे. यामुळे पुढील वर्षी रंगणाऱ्या वर्ल्ड कप वनडे स्पर्धेतील त्याच्या सहभागाबाबतही प्रश्नचिन्ह आहे. अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही रोहित दबावाखाली नाही, असे कोटक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वर्ल्ड कप वनडे स्पर्धेचे आयोजन पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे येथे होणार आहे. संघव्यवस्थापनाकडून रोहितला पूर्ण पाठिंबा असल्याचे कोटक म्हणाले.
Maharashtra TimesR Ashwin : आयुष्याचे 20 वर्षे देशासाठी खेळले, योग्य सन्मान व्हावा; रोहित शर्माच्या निवृत्ती वृत्तांवरुन आर अश्विनने बीसीसीआयला सुनावलं, काय म्हणाला?
दरम्यान, इंग्लंडविरूद्धच्या वनडे सामन्यामध्ये रोहित अपयशी ठरला. पहिला सामना भारताने जिंकला असला तरी दुसऱ्या सामन्यात मात्र भारतीय फलंदाज अपयशी ठरल्याने पराभवाचा सामना करावा लागला. भारत-इंग्लंडमधील मालिका १-१ने बरोबरीत झाली आहे. तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर पार पडणार असून या सामन्यात विजय मिळवत मालिका कोण खिशात घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.