Headlines

50MP कॅमेरा, 144Hz एमोलेड डिस्प्लेसह Tecno चा नवा फोन बाजारात, गेमिंगसाठी खास P1 Graphic Chip चिप । Maharashtra Times


टेक्नो कंपनीने आपला प्रीमियम स्मार्टफोन ‘Tecno Pova 8 Pro 5G’ भारतीय बाजारात लाँच केला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 49,999 ठेवण्यात आली आहे. यात युजर्सना आकर्षक ‘एलाइव मैट्रिक्स डिस्प्ले’ आणि 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल. या शक्तिशाली 5G स्मार्टफोनची अधिकृत विक्री 21 अगस्तपासून सुरू होणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Tecno Pova 8 Pro। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
दमदार बॅटरी बॅकअप शोधणाऱ्यांसाठी टेक्नोने नवीन Tecno Pova 8 Pro 5G सादर केला आहे. यामध्ये 6,500mAh ची अवाढव्य बॅटरी आणि स्मूथ परफॉर्मन्ससाठी 144Hz एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. 49,999 किमतीचा हा फोन प्रीमियम फीचर्ससह येतो. ग्राहक 21 अगस्तपासून हा फोन खरेदी करू शकतील.

Tecno Pova 8 Pro 5G या फोनमध्ये आकर्षक डिझाईन आणि दमदार फीचर्सचा भरणा आहे. Tecno Pova 8 Pro 5G हा स्मार्टफोन प्रामुख्याने गेमिंग शौकीन आणि पॉवर युजर्सना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. या फोनचे सर्वात मोठे फीचर म्हणजे याच्यामागील बाजूला देण्यात आलेला ‘Alive Matrix Display’ आणि तब्बल 6,500mAh क्षमतेची मोठी बॅटरी.

किंमत आणि सेल ऑफर्स

Tecno Pova 8 Pro 5G भारतात दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. याच्या 8GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज असलेल्या बेस व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 49,999 ठेवण्यात आली आहे. तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेला हाय-एंड व्हेरियंट 54,999 मध्ये खरेदी करता येईल.

Tecno Pova 8 Pro 5G हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी 21 ऑगस्ट 2026 पासून ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) आणि देशभरातील प्रमुख रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. लाँचिंग ऑफर अंतर्गत, बँक कार्ड्स आणि UPI व्यवहारांवर 3,000 चा इन्स्टंट कॅशबॅक दिला जात असून, यामुळे फोनची प्रभावी किंमत 46,999 पर्यंत खाली येते. याशिवाय, ग्राहकांसाठी 18 महिन्यांपर्यंतचे नो-कॉस्ट EMI पर्यायही उपलब्ध आहेत.

डिस्प्ले आणि सायबर फ्युचरिस्टिक डिझाईन

टेक्नोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा HyperLux AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 1.5K रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. यामध्ये तब्बल 4,500 निट्सची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे, ज्यामुळे कडक उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते. फोनच्या मागील पॅनलवर स्पेसशिपपासून प्रेरित ‘द प्रिजम ट्रिनिटी’ डिझाईन आणि Mini LED तंत्रज्ञानावर आधारित Alive Matrix Display आहे. हा रियर डिस्प्ले इनकमिंग कॉल्स, नोटिफिकेशन्स आणि बॅटरी चार्जिंग लेव्हलनुसार वेगवेगळ्या पांढऱ्या रंगाच्या ‘ब्रीदिंग लाईट’ इफेक्ट्ससह चमकतो.

परफॉर्मन्स आणि दमदार गेमिंग फीचर्स

उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 Ultimate हा अत्याधुनिक 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेमिंगचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी यात P1 Graphic Chip चा वापर करण्यात आला आहे, जी 144FPS पर्यंत गेमिंग फ्रेम इंटरपोलेशनला सपोर्ट करते. फोन गरम होऊ नये म्हणून यात 5,000mm² क्षमतेची ‘IceShield VC’ कुलिंग सिस्टीम जोडण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित HiOS 16 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.

कॅमेरा आणि बॅटरी बॅकअप

फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूला 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा (Sony LYTIA 700C OIS) आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स असलेला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनला अखंडित ऊर्जा देण्यासाठी 6,500mAh ची बॅटरी असून ती 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन आर्क व्हाईट, ग्रॅफाइट ब्लॅक आणि टुंड्रा ग्रीन अशा तीन आकर्षक रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी हे गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ मुख्य प्रवाहातील माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले एक व्यासंगी पत्रकार आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘टेक आणि सायन्स’ विभागात कन्सल्टंट म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तंत्रज्ञान विश्वातील वेगाने बदलणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे प्रगत तंत्रज्ञान, नवनवीन गॅझेट्स, टेक ट्रेंड्स, स्मार्टफोन रिव्ह्यूज आणि सायन्स क्षेत्रातील क्लिष्ट वैज्ञानिक घडामोडी अतिशय सोप्या, सर्वसामान्यांना समजेल अशा रंजक भाषेत मांडण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. डिजिटल मीडियातील अचूक SEO आणि Google Discover च्या बदलत्या अल्गोरिदमचा वापर करून लाखो वाचकांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘MGM’ संस्थेतून ‘एम.ए. पत्रकारिता आणि जनसंवाद’ ही मास्टर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘आकाशवाणी’ या प्रतिष्ठित संस्थेतून केली. 2017 मध्ये त्यांनी ‘दैनिक सामना’ या अग्रगण्य मुखपत्रात प्रवेश करत वृत्तपत्र पत्रकारितेचा भक्कम पाया रचला. त्यानंतर मुंबईतील ABP माझा, TV9 मराठी, साम TV, पुढारी न्यूज चॅनेल आणि लोकशाही न्यूज या महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राजधानी दिल्ली येथे ‘News Nation Marathi’ साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या न्यूज बुलेटिन्सचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सखोल अनुभवामुळे राजकारण, व्यापार-उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, सायबर सुरक्षा आणि लाइफस्टाईल क्षेत्रातील गुंतागुंतीच्या विषयांचे अचूक विश्लेषण करणे ही त्यांची प्रमुख ओळख आहे. पत्रकारितेच्या या व्यस्त प्रवासातून वेळ काढत, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा त्यांचा छंद आहे.आणखी वाचा