Headlines

300 Years Old well found आदिलशाही राजवटीतील ३०० वर्षे जुनी, ५३ पायऱ्यांची विहीर तहान भागवायला पुन्हा सज्ज…


कर्नाटकातील बेळगावी येथे सुमारे ३०० वर्षे जुनी एक विहीर लोकसहभागातून पुन्हा जिवंत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेळगावी जिल्ह्यात असणारी ही विहीर ३०० वर्षे जुनी असून तिला ५३ पायऱ्या आहेत. आश्चर्य म्हणजे इतक्या वर्षानंतरही या विहिरीचे बांधकाम मजबूत आहे.

परिसरातील लोकांनी आपल्या अथक परिश्रमाने काळाच्या ओघात गाडल्या गेलेल्या या विहिरीला पुन्हा भरले आहे. म्हणजेच ही विहीर आता लोकांची तहान भागवायला सज्ज झाली आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये विहिरीची रचना इतकी अद्वितीय आणि सुंदर दिसत आहे की, वरून पाहिल्यास ती शिवलिंगासारखी दिसते.

विहिरीचा व्हिडिओ पाहा

३०० वर्षे जुनी विहीर

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, जीर्णोद्धार केल्यानंतरची ही ऐतिहासिक पायऱ्यांची विहीर दिसत आहे. या संस्थेनुसार, कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील एका भव्य वारसा स्थळाचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. कचरा आणि ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या ३०० वर्षे जुन्या आणि ५३ पायऱ्यांच्या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

आदिलशाही राजवटीतील बांधकाम

एजन्सीच्या मते, ही ८० फूट खोल पायऱ्यांची विहीर मुघल राजवटीखाली भारतावर राज्य करणाऱ्या विजापूरच्या आदिलशाही राजवंशाच्या काळात, १५व्या ते १७व्या शतकादरम्यान बांधली गेली असावी, असा विश्वास आहे.

या संस्थेने केले पुनरुज्जीवनाचे काम

 बेळगावीच्या ‘थर्स्ट फाउंडेशन’ने एनएसएस स्वयंसेवक आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने या पायऱ्यांच्या विहिरीचा पूर्णपणे जीर्णोद्धार केला आहे. या विहिरीला ५३ दगडी पायऱ्या असून तिची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की, वरून पाहिल्यास ती शिवलिंगासारखी दिसते.





Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत