फ्रान्समध्ये पॅराशूट स्कूलचे विमान क्रॅश:5 विद्यार्थी, 5 प्रशिक्षक आणि पायलटचा मृत्यू, प्रशिक्षणासाठी उड्डाण भरताच संतुलन बिघडले
पूर्व फ्रान्समधील टॉम्बलाइन येथे रविवारी सकाळी एका पॅराशूटिस्ट स्कूलचे नागरी विमान कोसळले. या अपघातात विमानात असलेल्या सर्व 11 लोकांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 विद्यार्थी, 5 प्रशिक्षक आणि पायलट यांचा समावेश आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, म्यूर्थ-ए-मोजेल भागाचे प्रशासकीय अधिकारी (प्रीफेक्ट) यवेस सेगुई यांनी सांगितले की, विमानाने नॅन्सी-एस्से एअरड्रोमवरून उड्डाण केले होते, त्यानंतर स्थानिक वेळेनुसार…
