Sangli Khanapur Yerla Incident : सांगलीच्या खानापूरमध्ये येरळा नदीत ८ मुले बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी सर्वांनी मिळून मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून सातजण वाचले असले तरी वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: भाळवणी तालुक्यातील खानापूर येथील शिकलगार मळ्यामध्ये येरळा नदीमध्ये पोहायला गेलेली आठ मुले नदीमध्ये बुडाल्याची घटना समोर आली आहे. यामधील सात जणांना वाचविण्यात यश आले आहे. तर यामधील एका वीस वर्षीय मुलीचा दुर्दैवीरित्या बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे. फिरदोस जाकीर शिकलगार असे या मुलीचे नाव असून तिचे मूळ गाव कोरेगाव आहे तर ती मुंबई येथील रहिवासी होती.
नेमकी घटना काय?
भाळवणीमध्ये शिकलगार मळ्यामध्ये एका लग्न समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुंबई तसेच इतर बाहेर गावातून मोठ्या प्रमाणावर पाहुणे आले होते. येथील शिवतेज मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रम सुरू असताना काहीजण येरळा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले. त्यामध्ये 8 ते 10 लहान मुले व मुली होती. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे पालक सुद्धा होते. ही सर्व मुले 12 ते 14 या वयोगटातील होती. मुले पाण्यामध्ये खेळत असताना त्यांचे पालक नदीकाठावर पाहत उभा होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले पाण्याच्या खोल प्रवाहामध्ये गेली. त्याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी काही मुले धावली. या सर्व गोंधळामध्ये सात ते आठ मुले बुडाली.
मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न
यावेळी नदीच्या काठावर असलेल्या पालकांनी व इतर सर्वांनी नदीमध्ये धाव घेऊन मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी बुडालेल्या सात मुलांना वाचवण्यात आले. या मुलांना वाचवत असताना काही पालकांना पोहता येत नव्हते. ते सुद्धा या मुलांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उतरले होते. आपले वडील बुडत आहेत हे लक्षात आल्यानंतर नदी काठावर असलेल्या फिरदोस जाकीर शिकलगार या मुलीने वडिलांना वाचवण्यासाठी नदीमध्ये उडी घेतली. परंतु दुर्दैवाने वडिलांना वाचवण्याऐवजी फिरदोस पाण्यामध्ये बुडाली.
फिरदोस मात्र दगावली
सर्व बुडालेल्या मुलांना पाण्याबाहेर काढल्यानंतर तीन ते चार मुले अस्वस्थ होते त्यांना विट्याला खाजगी दवाखान्यामध्ये दाखल केले. यावेळी फिरदोस जाकीर शिकलगार या वीस वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचे मूळ गाव कोरेगाव होते तर ती मुंबई येथे रहावयास होती.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा