Who is jayden seales : पाकिस्तानविरुद्ध 18 धावांत 5 विकेट्स घेत वेस्ट इंडिजला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा जेडन सील्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अवघ्या 24 व्या वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 100 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. कोण आहे हा वेगवान गोलंदाज? जाणून घ्या त्याचा प्रवास.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यात २४ वर्षांच्या वेगवान गोलंदाज जेडन सील्सने आपल्या भेदक गोलंदाजीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात त्याने अवघ्या १८ धावांत ५ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाला एकाकी १२० धावांत ऑलआऊट केले. त्याच्या या तुफानी स्पेलच्या जोरावर वेस्ट इंडिजने ९० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यानंतर जेडन सील्सची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
१९ व्या वर्षी कसोटी पदार्पण
१० सप्टेंबर २००१ रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे जन्मलेल्या जेडन सील्सने जून २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच एका डावात ५ विकेट्स घेत, वेस्ट इंडिजकडून कसोटीत ५ बळी घेणारा सर्वात तरुण गोलंदाज होण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला होता.
अवघ्या २४ व्या वर्षी जेडन सील्स वेस्ट इंडिजच्या पेस-अटॅकचा मुख्य आधार बनला आहे. त्याने आतापर्यंत २९ कसोटी सामन्यांत २५.७३ च्या उत्कृष्ट सरासरीने आणि ३.३८ च्या इकॉनॉमीने १०८ विकेट्स पटकावल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट ४५.४ असा असून, त्याने तब्बल चार वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
फ्रँचायझी क्रिकेटमध्येही उमटवला ठसा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच जेडन सील्सने फ्रँचायझी आणि घरगुती क्रिकेटमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) तो ‘ट्रिनबागो नाईट रायडर्स‘ आणि ‘अँटिग्वा अँड बारबुडा फाल्कन्स’कडून खेळला आहे. याशिवाय इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये ससेक्सचे प्रतिनिधित्व करत त्याने आपल्या बॉलिंगला आणखी धार दिली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या या संस्मरणीय कामगिरीनंतर जेडन सील्सने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, भविष्यात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळण्याची क्षमता त्याच्यात पूर्णपणे आहे. त्याशिवाय भविष्यात भारताविरुद्ध खेळतानाही तो कोणत्या प्रकारचा खेळ दाखवतो, याकडेही लक्ष लागलेलं आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा