Headlines

जालन्यात भीषण अपघात:दोन बसची समोरासमोर धडक; 25 शाळकरी मुलांसह 30 जण जखमी, दोन्ही चालक गंभीर




जालना-वडीगोद्री महामार्गावर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातात ‘मानव विकास मिशन’च्या बसमधून प्रवास करणाऱ्या २५ शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे ३० प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. नेमका अपघात कसा झाला? मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ‘मानव विकास मिशन’ची एक बस (एमएच १४ एमएच १७५०) भांबेरी येथून सुमारे २५ ते ३० शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन अंबडच्या दिशेने येत होती. याच वेळी समोरून अंबडहून बीडकडे जाणारी दुसरी एसटी बस (एमएच १४ बीटी ३०२२) भरधाव वेगात येत होती. शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर बीडकडे जाणाऱ्या एसटी बसवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. यामुळे दोन्ही बसेसची समोरासमोर अतिशय जोरदार धडक झाली. दुसऱ्या एसटी बसमध्ये १२ ते १५ प्रवासी प्रवास करत होते. स्थानिकांची धाव अन् तातडीचे बचावकार्य दोन बसेसची धडक इतकी भयंकर होती की, त्याचा मोठा आवाज परिसरात घुमला. अपघाताचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या आणि रडणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना तसेच इतर जखमी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहतूक विस्कळीत, पोलिसांचा तपास सुरू या भीषण अपघातामुळे जालना-वडीगोद्री महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. सध्या जखमी विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची प्रकृती स्थिर असून, पोलीस या अपघाताचे नेमके कारण शोधत आहेत. हेही वाचा… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली:ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू; सर्व नियोजित कार्यक्रम रद्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील सततची धावपळ यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सविस्तर वाचा राज्यात पावसाचा जोर कायम:मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार, कोकणात रेड अलर्ट; विदर्भातही पावसाचा जोर राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र नागरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीमधील शाळांना प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत