Headlines

इंग्लंडकडून भारताचा दुसऱ्या टी-20 मध्ये पराभव, 22 वर्षांच्या पोराने फिरवली संपूर्ण मॅच, सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट


IND vs ENG 2nd T20 News : भारताने आज वैभवला उतरवलं पण विजयाची पाटी कोरीच राहिली. इंग्लंडच्या २२ वर्षीय खेळाडूने भारताच्या हातातून विजय हिसकावून घेतला. या सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट कोणता जाणून घ्या.

IND vs ENG 2nd T20
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पाहुण्या भारताचा ४ विकेटने पराभव केला. भारतान प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १९०-७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा युवा खेळाडू जेकब बेथल याने नाबाद ७६ धावांची खेळी करत सामना जिंकवला. भारताचा स्पिनर रवी बिश्नोई याच्या १७ व्या ओव्हरमध्ये २९ धावा गेल्याने संपूर्ण सामना फिरला. या सामन्यामध्ये बिश्नोईची ओव्हर गेमचेंजर ठरली, तिथूनच संपूर्ण सामना इंग्लंडने पारड्यात झुकवला. या विजयासह यजमान इंग्लंड संघाने १-० ने आघाडी घेतली आहे.

आजच्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी याने पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू ठरला. भारताकडून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा सलामीला आले होते. दोघांनी ५० धावांची सलामी देत भारताला एक चांगली सुरूवात करून दिली होती. अभिषेक शर्माने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत २४ चेंडू ४३ धावांची आक्रमक खेळी केली. यामध्ये त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. वैभवने १४ धावा करून तो लवकर आउट झाला, यामध्ये त्याने दोन षटकार लगावले.
Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi Debut : वैभव सूर्यवंशीने इतिहास रचलाच! सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडत टीम इंडियाकडून पदार्पण
वैभव आऊट झाल्यावर अभिषेक शर्माही ४३ धावांवर आऊट झाला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला होता. मात्र कॅप्टन श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी ४२ चेंडूत ६५ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. दोघांच्या महत्त्वाच्या खेळीने भारताने १५० धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारताच्या सलग दोन विकेट गेल्याने पुन्हा भारत बॅकफुटला गेला. मात्र शेवटला तिलक वर्माने ६ चेंडूत १८ धावा करत भारताला १९० पर्यंत पोहोचवले.
Maharashtra TimesIND vs ENG 2nd T20 : आज भारत-इंग्लंड दुसरा टी-20 सामना, वैभवची एन्ट्री फिक्स? सामना रात्री 10ला नाही मग किती वाजता?
दरम्यान, इंग्लंड संघाची सुरूवात एकदम खराब झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग याने दोन विकेट घेतल्या होत्या. फिल साल्ट ० धावा आणि जोस बटलर ० धावांवर माघारी परतले होते. त्यानंतर कर्णधार हॅरी ब्रूक आणि जेकब बेथल यांनी २३ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. मात्र तुफानी खेळी करणाऱ्या ब्रूकला अक्षर पटेल याने माघारी पाठवले. त्यानंतर टॉम बँटन आणि जेकब बेथल यांनी ५० चेंडूत ६७ धावांची भागीदारी केली. अर्शदीपने परत एकदा बँटनला ३९ धावांवर आऊट करत भारताला कमबॅक करून दिले. पण दुसरीकडे जेकब बेथलने एक बाजू लावून धरली होती. रवी बिश्नोई १७ वी ओव्हर टाकत होता, याच ओव्हरमध्ये त्याने तब्बल २९ धावा कुटल्या आणि सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकवला.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा